कवी आपल्या भेटीला
टॅमप्लीज् चं निमित्त...!
व्हर्चुअल ट्रीप उंबरधे टू मालवण सिंधुदुर्ग...!
पाठ्यक्रमात ज्यांची कविता असते त्यांच्याशी बोलता आले तर... नवा अनुभव घेण्यासाठी लेकरं सज्ज ...!
जे जे आवडलं ते ते आपल्यात साठवत बोलले दिलखुलास ती हातात घेतलेल्या बालकविता संग्रहाच्या कवींशी...!
"सर,भारी कविता आहेत ह्या.मस्त वाटत आहे."
"सर,हामना शालमा या, तुमला हामू मासा खावाडसूत."
पोरांची कविता वाचनाची चडाओढ,मी बोलणार आधी ..हे सारं मोठ्या दिलानं स्वीकारत बालकवी पांडूपुत्र नावाने लेखन करीत असलेले प्रा.डॉ.प्रकाश पांडुरंग गोसावी यांच्याशी व्हर्चुअल ट्रीपद्वारे संवाद साधला मुलांनी.
टॅमप्लीज् हा त्यांचा बालकविता संग्रह मुलांना फार आवडला.काही कविता समूहात गायल्यानंतर कवींशी व्हर्चुअल ट्रिपच्या माध्यमातून थेट संवाद साधता आला. मुलाखतीतून कवींना जाणून घेता आले. मुलांना पडणाऱ्या प्रश्नांना साजेशी उत्तरे कवींनी यावेळी दिलीत.बोलकी चित्रे,सहज असणाऱ्या कविता मुलांना आवडल्या.प्राणी,पक्षी,निसर्ग,माणसं, मुलं,खेळ,आजूबाजूचा परिसर,वस्तू यात सारच आलंय. 49 कवितांचा हा संग्रह भारीच जमलाय.'तुझी लेकरे,आनंदघन,अमुचा भारत देश, वृक्षमित्र होऊया,सावलीचे भूत, मिस्, उष:काल, फुल हसले,जादूगार अशा सर्वच कविता मनात घर करतात.सहजता ही लेखनशैली भावली.विशेष नो प्रस्तावना..थेट कविता...भारी जमलाय बाल कवितासंग्रह..!
मुलांच्या कल्पना अफाट असतात.त्यांना व्यासपीठ मिळाले की ते सहज व्यक्त होतात.यानिमित्ताने 'आम्हीही कविता करू शकतो', ' असं चित्र ते मला पण काढता येईल.' हा विश्वास मुलांमध्ये तयार झालाय. माळीनगर नंतर आता उंबरधे येथील बालकवी भरारी घेतील हा विश्वास या ट्रीपमुळे मिळाला.बालकवी पांडूपुत्र यांच्यांशी सहज संवाद साधल्याने मुलांना नवा मार्गदर्शक मिळालाय.एका उपक्रमातून नव्या उपक्रमाचा जन्म होत असतो.त्यासाठी कवीच्या उष:काल या कवितेच्या ओळी मोलाच्या आहेत...
झाले आभाळ केशरी
सूर्य जन्मला डोंगरी
सडा सोन्याचा शिंपीत
उषा आली अंगणात...!
बालकवी वैद्यकीय क्षेत्रातील असूनही थेट बालमनाचा ठाव घेत अतिशय छान कविता वाचायला मिळाल्यात.मुलं घरी घेऊन गेलीत वाचायला.कोणत्या वारी कोण वाचेल याचे नियोजनही झालंय...!
मुलांना नवं ते हवं असतं...आजचा हा प्रवास थेट मालवणापर्यंत..!
कवी आपल्या भेटीला च्या निमित्ताने...!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या..!
@गिरीजादूत
9665911657








No comments:
Post a Comment