मुखपृष्ठ

Saturday, June 24, 2023

आनंददायी शनिवार

आनंददायी शनिवार

         आमचा शनिवार असतो आनंददायी.झुंबा,योगासनं,प्राणायम,गप्पागोष्टी,गाणी,खेळ सारं असतं आज.मनासारखं शाळेत जगता आलं की शाळा नि घर यात फरक राहत नाही.

     झुंबा तर उपस्थिती वाढविण्यासाठी नवसंजीवनी ठरतोय.आजची उपस्थिती निश्चितच उत्साहवर्धक होती.इथे मुलं शाळेत येणं.ते थांबणं नि शिकणं आव्हानात्मक आहे.'बदल' हळूहळू घडतोय.

       प्रयत्न प्रामाणिक सुरू आहेत.मुलांना शाळेत आणण्यासाठी काही दिवस सातत्याने फिरणं झालं तर निश्चितच उपस्थिती वाढेल.त्यातच गुणवत्ता वाढेल.

प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या...!











Wednesday, June 21, 2023

जागतिक योग दिन

 जागतिक योग दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे येथे उत्साहात शिक्षण प्रेमी पालक व विद्यार्थी यांनी विविध योगासने,प्राणायम,ध्यान करत साजरा केला.
















Sunday, June 18, 2023

आनंददायी शनिवार

 झुंबा विथ वाडी वाडी ये ...!

ठिकाणं बदललं म्हणून काय झालं? मुलांना नवं ते हवं असतं.जर उपक्रमात नाविन्यता असेल अन् ते जर आनंददायी उत्साह वाढवणारं असलं तर मुलं त्यात पूर्णतः सहभागी होतात.

झुंबा आनंद देणारा व्यायाम प्रकार.यात 'आनंददायी शनिवार' अंतर्गत मुलांना हात,पाय,कंबर,मान यांच्या शारीरिक हालचाली तालबद्धपणे घेण्यात आल्या.

#झुंबा 

#आनंददायीशनिवार

#व्यायाम








Thursday, June 15, 2023

नवगतांचा प्रवेशोत्सव 2023

 नूतन वर्ष नूतन हर्ष नूतन प्रवेशोत्सव उंबरधे..!


शैक्षणिक वर्ष 2023-24 चा प्रवेशोत्सव प्रभातफेरी,गुलाबपुष्प,गणवेश,पुस्तक वाटप करून अन् खेळासह गप्पा,गाणी,नृत्यासह साजरा करण्यात आला.

       तंत्रस्नेही शाळेचा पहिला दिवस आनंददायी व्हावा.नवे ते स्विकारावे म्हणून शाळेच्या नूतन लोगोचे अनावरण कळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर नाना खैरनार यांच्या हस्ते झाले.शैक्षणिक ॲप्सचे अनावरण मुख्याध्यापिका मंगला पवार मॕडम,उपशिक्षक शांताराम मोरे यांच्या हस्ते तर ज्ञानप्रेरणा ब्लाॕग,शाळेचे फेसबुक पेज,यु ट्युब चॕनलचे अनावरण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल घुगे व पालक यांच्या हस्ते करण्यात आले.

    नव्या शाळेत स्वागत म्हणून मित्रवर्य देवेंद्र वायडेसह स्वागत करण्यात आले तर किरण केदार सर  व विश्वनाथ घोरपडे सर यांना निरोप देण्यात आला.त्यांनी केलेल्या कार्याचा यशोचित गौरव यावेळी ग्रामपंचायत उंबरधे,शाळा व्यवस्थापन समिती उंबरधे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे,विद्यार्थी यांनी केला.

     नूतन वर्षात पहिला दिवस प्रेरक होता..!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!


















Wednesday, June 14, 2023

नूतन वर्ष नूतन हर्ष





सौ.संगिता कारभारी पवार (मुख्याध्यापिका)

!!
श्री.शांताराम दामोदर मोरे

श्री.देवेंद्र बाळू वायडे


श्री.भरत विठ्ठल पाटील

 

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...