बाप्पा क्रिडा महोत्सव
मुलांना गणपतीचं सर्वांत जास्त आकर्षण असतं.त्यांचा गणेशोत्सवात असो कि इतर काळात तो दोस्तच..!
"आपल्या शाळेत गणपती बसवायचा हं.."
या हाकेला साद देत मोठ्या थाटात गणराज शाळेत विराजमान झालेत.आता हा सहशालेय उपक्रम कसा होईल यानिमित्ताने ठरला क्रिडा महोत्सव.यात चित्रकला स्पर्धा,लिंबू चमचा स्पर्धा,गोणपाट स्पर्धा,चेंडू बादलीत टाकणे,पट्टी बांधून बॉलला मारणे,संगीत खुर्ची असे एक ना अनेक खेळ घेण्यात आलेत.मुलांचा आवडीचा खेळ घेतला म्हणजे खेळाचा दर्जा वाढतो अन् त्यातून मिळणारा आनंद,कौशल्य मुलांचा आत्मविश्वास वाढवितात..!
चेंडू बादलीत टाकणे या स्पर्धेत पहिलीच्या भूषणने अंतरावरून तीन चेंडू बादलीत टाकले.कौतुकास पात्र ठरला नि त्याने जिंकल्याची खूण म्हणून वर केलेली तीन बोटं त्याच्या जिंकण्याचं महत्त्व अधोरेखित करत होते.
मुलांना खेळ मनापासून आवडतो.त्यात ते आनंदाने सहभागी होतात.यात जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षीस म्हणजे मजाच की..!
नाचणं,गाणं,मजा मस्ती...!
सारं सोबतीला असतांना पोरं म्हणालीच की दणक्यात..!
"आमच्या सरांनी गम्पती आणला..." ❤️
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!












































