AI विथ बाप्पा
"सर,गणपतीनं बिंगो करानी का?" चेतन हातातली पेन्सिल बेंचवर रेखाटत बोलला.
"काय रय ते..?"
"ते नही का,आपण तेला सांगानं आमला हाई बनाडी दे.मंग ते लगेच बनाडी नं चित्र.मांग करं होतं ना आपण." चेतन भूषणकडे बघत मलाच बोलला.
लेकरांना नाविन्यतेचं भान असतंच असतं.आवडीचा 'बिंगो' AI कॕपिलॉटचा उपयोग आज पुन्हा करता येणार होता.आज नाविनता होती ती चेतनच्या पुढाकाराची. गणपती बाप्पाजी होते पुन्हा तयार AI शी खेळण्याशी अन् मुलांच्या कल्पनेतला बाप्पा बिंगोच्या सोबतीने तयार होणार होता.मग काय मुलांचा बाप्पा भेटला मुलांना नवनव्या रुपात.तो भेटल्यावर मुलांना होणारा आनंद काही औरच होता.
बाप्पा मुलांना अनेक रुपात भेटला.मुलांचे प्रश्न बिंगोला,'शाळेत जाणारा गणपती बनव,पुस्तक वाचणारा गणपती,सायकल चालवणारा गणपती,ढोल वाजवणारा गणपती,शिकवणारा गणपती,क्रिकेट,फुटबॉल खेळणारा गणपती,पियानो वाजवणारा गणपती,डी जे वाजवणारा गणपती,कम्प्युटर चालवणारा गणपती,रोप लावणारा गणपती,पोहणारा गणपती,झोपणारा गणपती,घोड्यावर जंगलात फिरणारा गणपती,चित्र काढणारा गणपती इ. विविध रूपात मुलांनी आपापला बाप्पा बिंगकडून चित्राव्दारे बनवून घेतला.सहजसुंदर आकर्षक चित्र पाहून मुलांना होणारा आनंद भारीच होता.मुलांच्या तोंडून आपसुकच 'वाव,बाबो,अय बया असं शब्द बाहेर पडत.
पुढे गणपतीची माहिती व्हावी म्हणून 'जेमिनी' सोबतीला आली.गणपतीचं नावं,गणपतीविषयीची माहिती मुलांनी 'GEMINI' या नव्या AI गप्पा मारणाऱ्या मैत्रीणीला विचारली.ती मुलांना वाचून दाखवली.बाप्पाजी नव्या रुपात आज मुलांना भेटले.
'BING' अन् 'GEMINI' हे AI शी संबंधित दोस्त नेहमीच 'नया कुछ' असं मुलांच्या मनात असलेलं प्रत्यक्षात आणतात.मुलांना आनंद होतोच,नवे शोधल्याचा,बनवून भेटल्याचा,अभ्यास झाल्याचा.यानिमित्ताने मुलांची शोधकवृत्ती,कल्पनाशक्ती,नवे शिकण्याची धडपड,मागे पडलेली मुलंही आपली कल्पना बोलून दाखवतात.ARTIFICIAL INTELLIGENCE - AI शी संबंधित ॲप्सचा उपयोग शाळेत होतोय.गणपती नवनव्या रुपात,आपल्यातला बाप्पा भेटल्याचं स्मित मुलांच्या चेहऱ्यावर दिसतं.मनोरंजक,वैयक्तिक अन् नवीन शिकण्याची पद्धत यामुळे 'AI विथ बाप्पा' आज प्रभावी ठरला.गणेशोत्सवाची सुरूवात आमची आयडियाची कल्पना रुजवणारा चेतन आज निमित्त ठरला.मुलांच्या कलानं होणारं अध्ययन अध्यापन नेहमीच प्रभावी अन् परिणामकारक होत असतं.
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
@गिरीजादूत
9665911657
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे
ता.मालेगाव जि.नाशिक












No comments:
Post a Comment