नूतन वर्ष नूतन हर्ष नूतन प्रवेशोत्सव उंबरधे..!
शैक्षणिक वर्ष 2023-24 चा प्रवेशोत्सव प्रभातफेरी,गुलाबपुष्प,गणवेश,पुस्तक वाटप करून अन् खेळासह गप्पा,गाणी,नृत्यासह साजरा करण्यात आला.
तंत्रस्नेही शाळेचा पहिला दिवस आनंददायी व्हावा.नवे ते स्विकारावे म्हणून शाळेच्या नूतन लोगोचे अनावरण कळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर नाना खैरनार यांच्या हस्ते झाले.शैक्षणिक ॲप्सचे अनावरण मुख्याध्यापिका मंगला पवार मॕडम,उपशिक्षक शांताराम मोरे यांच्या हस्ते तर ज्ञानप्रेरणा ब्लाॕग,शाळेचे फेसबुक पेज,यु ट्युब चॕनलचे अनावरण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल घुगे व पालक यांच्या हस्ते करण्यात आले.
नव्या शाळेत स्वागत म्हणून मित्रवर्य देवेंद्र वायडेसह स्वागत करण्यात आले तर किरण केदार सर व विश्वनाथ घोरपडे सर यांना निरोप देण्यात आला.त्यांनी केलेल्या कार्याचा यशोचित गौरव यावेळी ग्रामपंचायत उंबरधे,शाळा व्यवस्थापन समिती उंबरधे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे,विद्यार्थी यांनी केला.
नूतन वर्षात पहिला दिवस प्रेरक होता..!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!















No comments:
Post a Comment