सीड बॉल कार्यशाळा
"ओ सर,आठे गुलमोहरन्या बिया पडेल सत." अजय आपले केस उडवत बोलला.
बियांकडे पाहत सहजच सीड बॉलची संकल्पना मनात डोकावून गेली.दोस्त देवेंद्रशी सीड बॉलविषयी बोलल्यावर सहजच प्रवास सुरू झाला परिसरातील बिया जमा करण्याचा.शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्व मुलांनी गुलमोहर,निंब,सीताफळसह हजारो बिया जमवून घेतल्या.
संगीता पवार मॕडमांनी पुढाकार घेत माती आणि खताची व्यवस्था केली.देवेंद्र वायडे सरांनी माती खत एकत्र करत मुलांना चिखल करून दिला.मुख्याध्यापक शांताराम मोरे यांनी सीड बॉल तयार करण्याचे फायदे व ते कसे तयार करावेत याविषयी मार्गदर्शन केले.
सुरु झाला प्रवास सीड बॉल तयार करण्याचा.मुलांनी गोल करून बसून घेतलं नि आपापली कामं वाटून घेत मातीचे सीड बॉल बनवण्याचा प्रत्यक्ष आनंद लुटला.त्यांच्यात होणारा सहज संवाद भारी होता.
"मन्ही,माटी दे ना यं".
"बी टाक ये तेनमा".
"सर,हाऊ बिया देत नाही मला."
"गारा दे रे आमला.."
"सर,येनी मन्हा कपडा भराई दिनात."
असे एक ना अनेक संवाद मुलांमध्ये अनौपचारिकरित्या घडू लागले होते.
सीड बॉल तयार झाल्यावर एका खोलीत ते ठेवण्यात आलेत.वनभोजन सहल निघतेय आता उद्या.सारे बनवलेले सीडा बाॕल बिरोबा महाराज टेकडी व कुशाबा च्या परिसरात या लावल्या जाणार आहेत.
मुलांचा हा लहानसा वन संवर्धनासाठीचा प्रत्यक्ष प्रयोग हजारो बियांचे रुजवण करून जाणार आहे.परिसरात असलेली निंब,गुलमोहर,पिंपळ,सीताफळ,बाभूळाची रोपही यानिमित्ताने लावली जाणार आहेत.मुलांचं हे परिसरातलं,मातीतलं शिक्षण खास होतं.
प्रेरक आहात...!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!











No comments:
Post a Comment