पक्षी वाचवा अभियान,उंबरधे
पर्यावरणवादी असलेली ही मुलं पुस्तकातलं जग प्रत्यक्षात जगतात.उन्हाळ्याची चाहूल लागली.आपल्या जवळ असलेल्या टाकाऊ डब्यांना योग्य काप देत झाडाच्या पायथ्याशी अन् झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केलीय.
टीम पक्षी वाचवा अभियान ही प्रत्यक्षात पुढाकार घेतेय.त्यांना साथ लाभतेय शिक्षकांची.निसर्गाचा सवंगडी पक्षी आपला मित्रच आहे.हे त्यांनी अनुभवलंय.आपल्या सोबत पाखरांची शाळा ही मुलं अनुभवतील.
मुलांनी प्लॕस्टीक डब्बे,बाटल्या,फुटके माठ,तार,दोरा,सुतळी या साधनांचा उपयोग केला असून गावातील पर्यावरणवादी युवकांनीही यासाठी मदत करून पुढाकार घेतला आहे.
पक्षी संवर्धन काळाची गरज असून त्यासाठी चिमुकल्यांचा पुढाकार प्रेरणादायी आहे.मुलं 'पक्षी वाचवा अभियान' करिता जागृती करणार आहेत.आम्ही पुढाकार घेतलाय आपणही घ्यावा हा छोटासा संदेश ते देत आहेत.
चला तर मग,
आम्ही सुरूवात केलीय,आपणही करा..!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
@गिरीजादूत
#पक्षीवाचवाअभियान2024
#उंबरधे
#शाळा











No comments:
Post a Comment