मुखपृष्ठ

Saturday, October 14, 2023

देणं

 


देणं 

       शाळेच्या भौतिक विकासासाठी गाव उभं राहिलं की शाळेचा सर्वांगीण विकास साधण्यास नेहमीच मदत होते.'देणं' हा शब्दच जगलेल्या अन् जगत असलेल्या प्रेरकांकडून नेहमीच प्रेरणा मिळत आलीय.

        आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ उंबरधे गावातील जेष्ठ नागरिक भाऊसो.संजय शेरेकर यांनी शाळेच्या रंगकामाचा सारा खर्च उचलला.देखणी,सुंदर शाळा आज पुन्हा उभी राहिलीय.

         युवा मित्र परिवार उंबरधे यांनी तर एकत्र येत शाळेला तंत्रज्ञानाची साथ लाभावी.आपल्या शाळेतील विद्यार्थी तंत्रस्नेही व्हावा यासाठी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत सरासरी  16 हजार किमतीचे दोन 'आय बाॕल कंपनीचे टॕब' आज शाळेस भेट दिलेत.

      सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबासो.साहेबराव लक्ष्मण वाघ यांनी आज शाळेस 10 हजार रुपये मदत जाहीर करून वेळोवेळी गाव आपणांस सहकार्य करत राहिल असे आश्वासन देत मार्गदर्शन केले.

      शाळेच्या भौतिक विकासासाठी गाव,ग्रामपंचायतीसह सारेच घटक वेळोवेळी आपली मदत करतच असतात.हे प्रेरणादायीच आहे.

       'देणं लागणं' हा संस्कार आपल्या वागण्यातून,बोलण्यातून,वर्तनातून घालून देणारी जेष्ठ पिढी खरोखरच आपल्यासाठी निश्चितच दिशादायी आहे.आपण सारेच शाळेच्या प्रगतीसाठी सदैव पाठिशी असतात हे ऊर्जादायी आहे.

युवा मित्रांनो प्रेरक आहात..!

आम्ही आपले सदैव ऋणी असू...!

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!










शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...