दीपोत्सव
कृतीयुक्त सहभाग घ्यायला आवडतो मुलांना.दिवाळी अन् रचनावाद आमचा ठरलेला असतो.परिसरातील पान,फुलं,खडे यांच्या सहाय्याने HAPPY DIWALI तयार करणं,लागणारे साहित्य जमा करणं,आपापसात ते वाटून घेणं,संवाद साधणं हे सारं येत यात.विषयांचा अभ्यास हा असाच सहज रुजत असतो मुलांमध्ये.
चित्र रेखाटणं,डिजीटल पाट्यांवर ते तयार करणं.तंत्रज्ञानाचा उपयोग करत पिक्स आर्टमध्ये डिजीटल ग्रिटींग्ज तयार करणं ते समजून घेणं आवडतं मुलांना..!
'दीपोत्सव' हा आनंद देणारा असतो.यात कृतीशिलता आली की चैतन्य निर्माण होते मुलांत.सण आणि कृतीयुक्त अभ्यास आता सहजच तयार होतोय.काय करायचंय ते आपसुकच मुलं ठरवतात.आपण फक्त दिशा द्यायची असते अन् त्यांच्या कुतूहलयुक्त प्रश्नाना हवा असतो आपला 'होकार'...!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!












No comments:
Post a Comment