एक दिवस शाळेसाठी
दप्तरमुक्त शनिवार आणि झुंबा डान्स उंबरधे शाळेचा ठरलेलाच.विद्यार्थ्यांना शालेय वयातच तालबध्द हालचालींसह व्यायामाचं महत्त्व कळावे यासाठी उंबरधे गावाचे भूमीपुत्र सेवानिवृत्त शिक्षक सुरेश वाघ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यात विद्यार्थी खान्देशी गीतावर करत असलेला तालबद्ध हालचालींचा झुंबा डान्स व व्यायाम यांचा सहसंबंध स्पष्ट करत शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी तो कसा उपयुक्त आहे हे यावेळी सरांनी स्पष्ट केले.मनुष्याला चांगले जीवन जगायचे असेल तर त्याने दररोज व्यायाम करावा जेणेकरून त्याचे स्वास्थ्य तंदुरुस्त रहाते.मनोरंजनातून होत असलेले शारीरिक शिक्षण महत्त्वाचे असून यातून शारीरिक शिक्षणाची कौशल्यांचा विकास होईल असे प्रतिपादन यावेळी वाघ सर यांनी केले.
थंडीतला झुंबा नेहमीच ऊर्जादायी असतो.मुलांना आनंद हवा असतो त्यासोबत हवं असलेलं शिक्षण मनोरंजनात्मक पद्धतीने मिळालं म्हणजे त्याचा सकारात्मक परिणाम उपस्थिती,घेत असलेलं शिक्षण यातून मिळतो.आपल्याला नेहमीच मुलांच्या वर्तनावरून व आनंददायी चेहऱ्यावर असलेल्या भावावरून त्यांना काय हवं असतं हे नेहमीच जाणवतं ..!
चला तर मग योगदान देऊयात 'एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमातून..!
@गिरीजादूत






No comments:
Post a Comment