मुखपृष्ठ

Thursday, February 1, 2024

सोबतीने समृद्ध होऊयात

 सोबतीने समृद्ध होऊयात..!


      आज उंबरधे गावाचे भूमीपुत्र पवन ताडगे दादा यांनी शाळेस सदिच्छा भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले आणि शाळेच्या भौतिक बाबींच्या विकासासाठी 3000/- ची आर्थिक मदत केली.दादाने भविष्यात शालेय विकासाला आवश्यक असलेली मदत करण्याचे यावेळी सांगितले.छोट्याशा मुलाखतीत 'नवा दोस्त' मिळाल्याची भावना निर्माण झाली.दादाचा 'प्रेरक संघर्ष' निश्चितच दिशादायी आहे.आधीही टॕब घेण्यासाठी दादाचे अनमोल योगदान होते अन् आजही पुन्हा त्यांच्या दातृत्वाची प्रचिती पुन्हा आली.ऋणी आहोत दादा..!

❤️🙏🏻❤️


         शालेय भौतिक सुविधेत आज ग्रामपंचायत उंबरधे यांच्या सहयोगातून शाळेस सोलर कीट कार्यान्वित झाले.आनंद झाला.नव नव्या उपक्रमात ग्रामपंचायतीचा पुढाकार प्रेरक आहे.❤️🙏🏻❤️


        शरद पवार फेलोशिप अंतर्गत मुलांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी आज आमच्या ताफ्यात नवा लिनोवाचा टॕब दाखल झाला.❤️🙏🏻❤️


       दोस्त देवाचा मुलांसोबतचा सेल्फी नवा दोस्त सोबतीला आल्याचा आनंद देऊन गेला.


प्रेरक आहात..!


प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!






No comments:

Post a Comment

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...