मुखपृष्ठ

Thursday, February 15, 2024

तंत्रस्नेही जगणं

 तंत्रस्नेही जगणं

      आमचं तंत्रस्नेही शिक्षण असच हसत खेळत असतं..!

टॕबचा उपयोग करत आज आम्ही अनुभवलं मोजणं,मिळवणं..!

सोबतीने शिकणं,दणादण पटकन बोट फिरवणं,माझच उत्तर कसं बरोबर हे सांगणं,

"हाऊ,सं पाच" म्हणत पटकन उत्तर बरोबर करणं.हे सारं शिकत होती पोरं एकमेकांसोबत..!

         सोबतीने समृद्ध होण्यात खूप मजा असते.हा अनुभव वेळोवेळी घेत असतात.शिकण्याचा आनंद पोरांनी अनुभवला 'Math kids' सोबत.'कामात वा शिकण्यात थोडा बदल केला कि स्विकारतात पोरं' हा आजवरचा अनुभव.प्रत्यक्षात न चमकणारी पोरं आज पटापट उत्तर शोधत होती ती तंत्रज्ञानाच्या या साधनामुळे हे विशेष..!

        'मुलांना नवं हवं असतं' ते फक्त आपण समयसुचकतेने पुरवावं म्हणजे अपेक्षित असणारा परिणाम साहजिकच आपल्याला मिळून जातो.टॕबचा उपयोग सकारात्मक केल्याने मुलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आज पुन्हा अनुभवता आला.

        तंत्रज्ञानचा उपयोग हा वेळोवेळी केल्याने मुलांमध्ये येणारा उत्साह हा चैतन्य निर्माण करणारा असतो.त्यांना मिळालेलं बक्षीस,दिलेलं आव्हान पूर्ण केल्यावर त्यांना होणारा आनंद हा परमोच्च असतो फक्त तशी परिस्थिती निर्माण करणं गरजेचं असतं.तंत्रस्नेही होतांना वाटेला आलेलं जगणं मनसोक्त जगता आलं पाहिजे हा संदेश मुलं प्रत्येक आव्हानाला पार करत देत होती हे विशेष होतं.


प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

@गिरीजादूत 







No comments:

Post a Comment

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...