मुखपृष्ठ

Tuesday, February 27, 2024

बालकवी घडतांना

  बालकवी घडतांना

      कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना अभिवादन करत उंबरधे येथे आज मराठी राजभाषा दिवस हा उत्साहाने साजरा करण्यात आला.पाठ्यपुस्तकातील कवितांचे वाचन यावेळी विद्यार्थ्यांनी केले.काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.

       आजच्या दिवशी उंबरधे शाळेचे बालकवी आम्हांला शोधता आले.सर्वनामांचा उपयोग करत सृष्टीने स्वरचित 'माय मराठी' तर शिलवानने क्रियापदांचा योग्य उपयोग करत 'मराठी' ही कविता लिहली.दोघांनिही पिक्स आर्ट या ॲप्समध्ये स्वरचित कवितेचे ग्रिटींग्जही तयार केले.राज अन् निखीलने छान प्रयत्न केला.मुलांचा यावेळी शाळेकडून बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.बालकवी शाळेत निर्माण होण्याचा मुहुर्तमेढ आज कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या जन्मदिनी लाभला हे भारीच आहे.लेकरांना आत्मविश्वास वाढलाय.'आम्ही लिहू शकतो' हा विश्वास लेकरांमध्ये निर्माण झालाय.योग्य व्यासपीठ मुलांना भेटलं.'बालकवी घडतांना' हा अनुभव पुन्हा घेता येतोय.'वाचकांची शाळा' हा उपक्रम अन् त्यातून मुलांना वाचायला मिळत असलेलं साहित्य उपयोगी पडतंय.हे जाणवतंय.

      प्रत्येक इयत्तेतील प्रातिनिधीक विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कवितेचे वाचन व गायन केले.उपशिक्षक देवेंद्र वायडे सर यांनी


'पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका,

मीच विनवितो हात जोडूनी वाट वाकडी धरू नका'


ही कविता सादर केली.

भरत पाटील यांनी,


'प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं'

ही कविता तर मुख्याध्यापक शांताराम मोरे सर यांनी 


'मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा'


 'कणा' ही कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता सादर केली.

      मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्ताने आज कवीश्रेष्ठांना कृतीयुक्त अभिवादन करता आले.बालकवी घडतांना अनुभवणं खास होतं.मुलं तंत्रज्ञानाचा उपयोग करायला शिकली हे आणखीनच भारी आहे.

प्रेरक आहात.

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या


@गिरीजादूत 

9665911657


















No comments:

Post a Comment

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...