शॉर्टफिल्म्स अनुभवतांना
"सर,तुमचा हात असा कसा काय झाला होता?" आदित्य बोलला.
"अरे बाळा,मी तसा रोल केला होता.हा पहा माझा हात चांगला आहे.तुला आवडली का फिल्म?"
प्रा.जयराम माळी मोठ्या कुतूहलाने आदित्यच्या प्रश्नाला प्रतिसाद देतात.
दप्तरमुक्त शनिवार अन् ठरलेल्या ॲक्टिव्हिटीज् झाल्यावर मुलांमध्ये बाहेरच्या जगाचं भान निर्माण व्हावं म्हणून आठवड्यातून एकतरी सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक विषयावर आधारित शॉर्टफिल्म ही दाखवली जाते.आज आम्ही आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शॉर्टफिल्म मैला,म्हसणखाई,सैर या शॉर्टफिल्म अनुभवल्या.मुलांचा संवाद यातील कलाकारांशी व्हावा म्हणून या शॉर्टफिल्मचे निर्माते,दिग्दर्शक,कलाकार प्रा.जयराम यांच्याशी व्हिडिओ काॕन्फरन्सने संवाद साधला.यातून त्यांनी मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि शॉर्टफिल्मचा प्रवास त्यांनी सांगितला.
मागील काही दिवसांपूर्वी 'सैर'चे कलाकार निरज देवरे यांच्याशीही संवाद करता आला होता.मुलं आपलं भावविश्व शोधत असतात.मुलांमध्ये असलेली संवेदनशिलता यावेळी आपल्याला अनुभवता येते.कधी चेहऱ्यावर हास्य तर कधी दुःखाची झालरही येथे पाहता येते.अनुभवातलं जगणं या फिल्ममध्ये पाहत असलेली ही मुलं ती पाहिल्यावर भरभरून बोलतात.विचारलेल्या प्रश्नांना आपल्या भाषेत उत्तरं देतात.कधी कधी स्वभाषेतून समजलेलं बोलून दाखवतात.
प्रा.जयराम माळी यांच्याशी झालेला संवाद हा प्रेरक होता.स्वतःचं जगणं शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मांडणारा हा कलाकार गडी सहजच मुलांना आपलंस करण्यात यशस्वी झाला होता.टिव्हीतला कलाकार आपल्याशी प्रत्यक्षात संवाद साधतो हे पोरांना आवडून गेलं.नव नवे विषय घेऊन प्रेक्षकांना सामाजिक भान देणारं हे व्यक्तीमत्व खास होतं.
"पोरांनो कष्टाला पर्यायच नसतो". हे प्रा.जयराम माळी यांचं वाक्य मनात घर करून गेलं.त्यांचा हा प्रवासच प्रेरणादायी होता अन् आहे आमच्यासाठीही.मुख्याध्यापक शांताराम मोरे सर,संगिता पवार मॕम,देवेंद्र वायडे सर यांचाही संवाद यावेळी झाला.शॉर्टफिल्म पाहिल्यावर आलेला अनुभव जयराम सरांशी शेअर करता आला.
मुलं ही मोठ्या उत्साहाने शाळेत येतात.ते 'हर रोज नया कुछ मिलेगा' या आशेने शाळेत येतात.दररोजच्या जगण्याला थोडं फाटा देत शॉर्टफिल्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन मूल्यांचा विकास हा साधता येतो.या शैक्षणिक वर्षात अनेक शॉर्टफिल्म ह्या मुलांना दाखवता आल्या.त्या पुढीलप्रमाणे ...
सैर
म्हसणखाई
मैला
कोरोना झोन
कट्टी
डांबर
पांढरा चिवडा
चप्पल
चिकाटी
पाढा
पेन्सिल
कर्म
भिरभिरं
भाकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
जिजाऊ
स्वामी विवेकानंद
वर्ग
दप्तर
भान्या
वही
झिरो
या शॉर्टफिल्म जगणं समृद्ध करतात.यु ट्युबवर उपलब्ध आहेत.पाहता येतील.
प्रेरक आहात.
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!
@गिरीजादूत
9665911657





No comments:
Post a Comment