सीडबॉलचे रूपांतर झाले शेकडो रोपांत
उंबरधे शाळेच्या विद्यार्थ्यांचा सीडबॉल उपक्रम यशस्वी
उंबरधे शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील निम,गुलमोहर,बकाम,जांभूळ,आंबा,चिंच,बोर यांच्या सहज उपलब्ध होणाऱ्या बिया यांचा संग्रह करत त्यापासून सीडबॉल तयार केले होते.ते त्यांनी गावाच्या परिसरात असलेल्या बिरोबा महाराज टेकडीवर लावलेत.सातत्याने होणाऱ्या पावसाने सीडबॉलचे रूपांतर आता छोटया छोट्या रोपात झालेले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम हा शाळेत राबविला गेला.माती आणि शेण यांचे योग्य मिश्रण करत,योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले.शाळा सुरू होण्याच्या दिवसात अन् पावसाळा सुरू होण्याच्या योग्य कालावधीत हा उपक्रम राबविला गेल्याने बी रुजण्यास मदत झाली.विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सीडबॉल तयार करत अन् त्यांची रुजवण टेकडीवर केल्याने आज शेकडो रोपे तयार झाली आहेत.उंबरधे शाळेचा सीडबॉल निर्मिती उपक्रम हा अनेक शाळांनी राबविला.सीडबॉल निर्मिती हा वृक्ष लागवडीसाठी सर्वात साधा आणि सोपा उपाय असल्याने तो सहज राबाविता येतो.
प्रत्यक्ष कृतीयुक्त असलेला सीडबॉल निर्मिती उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय दृष्टिकोन निर्माण करण्यास पुरेसा ठरलाय.आनंददायी कृतीयुक्त बिया रोवण्याची पद्धत,रुजवण्याची,उगवण्याची पर्यावरणपूरक पद्धत निसर्ग संवर्धन करण्यासाठी मदत करणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती,वृक्ष संवर्धन ही मूल्ये रुजवण्यात शाळेचा हा उपक्रम यशस्वी ठरलाय.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शांताराम मोरे,संगीता पवार,देवेंद्र वायडे,भरत पाटील व पालकांचे मार्गदर्शन लाभले.























No comments:
Post a Comment