☃💦🎲🏡📱🎉🌑🌳🌸🎯🌀
मातीतलं जगणं
परिसरात असलेली माती.तिचा चिखल बनवून,हव्या त्या मित्र मैत्रीणींसोबत,आपापल्या हवं ते बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालंय याची जाणीव झाली कि तयार होतात मग मनापासून मातीच्या वस्तू.
मातीपासून बैल बनविणे कार्यशाळा संपन्न झाली.यात मुलांनी बैलांसोबत मातीपासून ग्रामीण संस्कृतीशी संबंधित अनेक वस्तू बनवल्या.यात कपबशी,तबकडी,ताट,पोळपाटले,लाटणे,खलबत्ता,खुर्ची,टेबल,घर,बैलगाडे,पलंग,चुल्हा,मोबाईल,गणपती,महादेव पिंड अशा एक ना अनेक बाबी आपल्या कल्पकतेने मुलांनी तयार केल्यात.सोबतीला बैलपोळा कविता अन् संगीत असल्याने मुलांनी आनंदाने या वस्तू तयार केल्यात.
मातीतं शिक्षण हे कलेचं शिक्षण असतं.निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो.फक्त त्याचा उपयोग ज्या त्या वेळी करणं गरजेचं.मातीत रूजवलेलं पूर्ण ताकदनिशी उगवतं,त्यास मातीही साथ देत असते.माती हा घटक घेऊन अनेक संबोध अभ्यासता आलेत.विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उडू दिलं की जमतं.कोणाच्या डोक्यातून काय येईल काही सांगता येत नाही.सर्जनशील अन् चिकत्सक विद्यार्थी हे अशा छोट्या उपक्रमातूनच आपल्या भन्नाट कल्पनांना मोकळीक देत असतात.मातीचा चिखल करणं अन् त्यातून नवनिर्मिती करणं सोपं होऊन जातं,जेव्हा चिमुकल्यांनी तयार केलेलं सारं स्विकारलं जातं तेव्हा.कलेतून शिक्षण दिलं की आवडीचं म्हणून विद्यार्थीही प्रतिसाद देत असतात.आपण राबविलेला छोटासा उपक्रम यातूनच लेकरांचं शालेय सामाजिकीकरण होत असतं.जवळीकता अन् मदतीची भावना निर्माण होण्यास हे उपक्रम मदत करीत असतात.म्हणूनच मातीच्या मदतीतून दिलेलं आजचं कलेचं शिक्षण महत्त्वाचे होतेच.हे मातीतलं जगणं कळण्यासाठी हाताला मातीचा स्पर्श होणं गरजेचं असत़ं.
मुलांच्या हातांमध्ये असलेली जादू अनुभवण्यासाठी हे उपक्रम खास असतात.मुलांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद टिपण्यासाठी हे 'मातीतलं जगणं' महत्त्वाचे वाटते.
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या
@गिरीजादूत
☃💦🎲🏡📱🎉🌑🌳🌸🎯🌀

















No comments:
Post a Comment